१. |
चैत्र शुद्ध प्रतिपदा |
गुढीपाडवा |
गुढीपाडव्याला नाथसमाधीस चंदनउटी लेप लावून महापूजा केली जाते. |
२. |
चैत्र शुद्ध अष्टमी |
श्रीरामनवमी |
परंपरेप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. |
३. |
वैशाख शुद्ध तृतीया |
अक्षयतृतीया |
परंपरेप्रमाणे अभिषेक महापुजेचे आयोजन केले जाते. |
४. |
जेष्ठ कृष्ण एकादशी |
पायी पालखी सोहळा |
श्री क्षेत्र मढी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी पालखी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होते. |
५. |
आषाढ पौर्णिमा |
गुरुपौर्णिमा |
परंपरेप्रमाणे गुरुपौर्णिमा महापूजा उत्सव साजरा केला जातो. |
६. |
श्रावण शुद्ध पंचमी |
नागपंचमी |
सालाबाद प्रमाणे कुस्ती हंगामाचे आयोजन केले जाते. |
७. |
श्रावण शुक्रवार |
नाथ पालखी |
श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी पालखी सोहळा साजरा केला जातो. त्यात तिसऱ्या शुक्रवारी पालखी सोहळ्याचे विशेष महत्व आहे. |
८. |
श्रावण कृष्ण अष्टमी |
श्रीकृष्णजयंती |
परंपरेप्रमाणे या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. |
९. |
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा |
पायी पालखी सोहळा |
श्री क्षेत्र मढी ते श्री क्षेत्र येवलवाडी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होते. |
१०. |
अश्विन शुद्ध प्रतिपदा |
घटस्थापना |
सालाबाद प्रमाणे या दिवशी गडावर देवी मंदिरात घटस्थापना करून नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. |
११. |
अश्विन शुद्ध दशमी |
विजयादशमी |
परंपरेप्रमाणे या दिवशी विजयादशमी निमित्ताने सीमोल्लंघन उत्सव साजरा होतो. |
१२. |
अश्विन शुद्ध पौर्णिमा |
कोजागिरी पौर्णिमा |
यादिवशी गडावर भजनसंध्येचे आयोजन करून उत्सव साजरा करण्यात येतो. |
१३. |
अश्विन अमावस्या |
दिपावली |
या दिवशी सायंकाळीगडावर लक्ष्मीपूजन व दीपोत्सव साजरा करण्यात येतो. |
१४. |
कार्तिक पौर्णिमा |
त्रिपुरारी पौर्णिमा |
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने गडावर दीपोत्सव महोत्सव साजरा करून “लेकी वाचवा” हा संदेश दिला जातो. |
१५. |
मार्गशीर्ष पौर्णिमा |
श्री दत्त जयंती |
सालाबाद प्रमाणे या दिवशी गडावर श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. |
१६. |
माघ शुद्ध द्वितीया |
धर्मनाथ बीजोत्सव |
या दिवशी गडावर धर्मनाथ बीजोत्सवा निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन केले जाते. |
१७. |
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा |
भट्टी सण |
मढी गावातील होळीसाठी संपूर्ण गावातील गोवऱ्या एकत्र करून गडावर सामुदायिक होळी सण साजरा केला जातो. |
१८. |
फाल्गुन शुद्ध पंचमी |
तेल लावणे |
मढी ग्रामस्थांकडून परंपरागत निर्बंध पाळून यात्रा तयारीला मदत केली जाते. |
१९. |
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा |
मानाची होळी व मानाची काठी |
सकाळी १० वाजेच्या सुमारास कैकाडी समाजाची मानाची काठी ऐतिहासिक कळसाला भेटवली जाते व सायंकाळी गोपाळ समाजाच्या हस्ते मानाची होळी पेटवली जाते . त्यानंतर यात्रेस प्रारंभ होतो . |
२०. |
फाल्गुन वद्य रंगपंचमी |
नाथसमाधी दिन यात्रा उत्सव सोहळा |
परंपरेप्रमाणे समाधीदिन यात्रा उत्सवामध्ये मानाच्या व कुलदैवत काठ्या भेट सोहळा. |
२१. |
फाल्गुन वद्य अमावस्या |
फुलबाग यात्रा |
सालाबादप्रमाणे कावडीकरांकडून नाथांच्या संजीवनी समाधीला गंगाजलाने अभिषेक सुरु होतो. |
२२. |
प्रती अमावस्या |
अमावस्या उत्सव |
परंपरेप्रमाणे मासिक नाथउत्सव सोहळ्यात लाखो नाथभक्त नाथदर्शनाचा लाभ घेतात. |
२३. |
प्रती कृष्ण एकादशी |
कीर्तन |
एकादशी निमित्ताने गडावर समाजप्रबोधनात्मक हरीकीर्तन व फराळाचे आयोजन केले जाते. |