देवस्थान माहिती
मौजे मढी, ता. पाथर्डी, जि.अहिल्यानगर येथे चैतन्य कानिफनाथ महाराजांचे संजीवन समाधी मंदिर असून सदर मंदिर श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी या नावाने नोंदणीकृत आहे.सदर न्यासाचा नोंदणी क्रमांक हा ई ८९/१९५४ असा आहे.
- श्री कानिफनाथ महाराजांनी १० व्या शतकात समाधी घेतली असून सदर मंदिराची उभारणी १७ व्या शतकात झाली.
- सदर मंदिराचे बांधकाम दगडी असून सदर मंदिर परिसराचा आकार गड किल्ल्यासारखा आहे.
- सदर मंदिर आवारात मंदिराचे इतिहास सांगणारे अनेक शिलालेख आहेत.
- मंदिर आवारातील समाधीमंदिर, सभामंडप, ध्यानमंदिर, नगारखाना,बारदरी व गादीघर हे वास्तुरचनेचा भाग आहे.
- मंदिराच्या या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे सकाळी नाथसमाधीवर तर सायंकाळी ध्यानमंदिरातील महादेवाच्या पिंडीवर किरणोत्सव होतो
- चैतन्य कानिफनाथ महाराजांची समाधी दक्षिण उत्तर असून मूर्ती पूर्वाभिमुख तीन फुट उंचीची संगमरवरी आहे. नाथपंथीय वेशभूषेत बगलेत झोळी, शंख, डमरू, चिमटा, खडावा, मेखला, शिंगी, सारंगी, कुंडल, कमंडलू, कुबडी-फावडी, घुंगरू, रुद्राक्ष माळा, कंगण, गोपीचंद, अष्टगंध, भिक्षा पात्र आहे. उजव्या बाजूला चांदीचा त्रिशूळ आहे.
वार्षीक उत्सव
गुढीपाडवा
गुढीपाडव्याला नाथसमाधीस चंदनउटी लेप लावून महापूजा केली जाते.
श्रीरामनवमी
परंपरेप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो.
अक्षय्य तृतीया
परंपरेप्रमाणे अभिषेक महापूजेचे आयोजन केले जाते.
